प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ – कुडाळ युवा फोरम भारत संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा उमेद उपक्रमाचा प्रारंभ कुडाळ येथून करण्यात आला आहे. युवा फोरमच्या माध्यमातून गेल्या एका वर्षापासून राज्यातील अनेक भागात उमेद मार्फत माझी शाळा हा उपक्रम राबवला जात असून, या माध्यमातून अनेक भागात राहणाऱ्या गरीब गरजू व वस्तीवर राहणाऱ्या मुलांना त्यांच्या वस्तीवर जाऊन शिक्षण दिले जाते.
या उपक्रमाला मुलांचे स्थलांतर झाल्याने काही काळ खंड पडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या मुलांना शिक्षणापेक्षा शिक्षणाची आवड निर्माण करणे फार गरजेचे आहे. यासाठी समाजातील सुज्ञ नागरिकांची साथ अपेक्षित असल्याचे मत युवा फोरम चे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी व्यक्त केले


