येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

0
120

हिंगोली जिल्हयात आज दुपारपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असून या पावसामुळे ओढे व नाले भरून वाहू लागले आहेत.येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 सोमवार ५ सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 6 सप्टेंबरला कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तर मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 7 सप्टेंबरला नाशिक, औरंगाबाद, पालघरसह ठाणे, जालना, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, तर 8 सप्टेंबरला पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here