‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरावर त्याची पत्नी निशा रावलने मारहाण केल्याचा आरोप करत 31 मे रोजी पोलिसांकडे तक्रार देखील होती. गोरेगाव पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर 25 जून रोजी तक्रार दाखल करून घेतली आहे. निशाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी करणला अटक केली होती. मात्र काही तासांनंतरच त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. निशा रावल हिने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.तसेच करणचे दुसर्या मुलीशी प्रेमसंबंध आहेत असेही तिने मीडियाला सांगितले आहे. तिने करणला याबद्दल विचारणा केली असता त्यानेही ही स्वतः विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली असल्याचे सांगितले. .
यावेळी करणने त्याची बाजू मांडताना निशा नेहमी शिवीगाळ करते,भांडण करते असा आरोप केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने, ‘निशा सांगते त्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी फोनवर बोलण्यासाठी खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.’