रत्नागिरी:अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न

0
41
भाट्ये येथे संशयावरून पत्नीला जबर मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल
भाट्ये येथे संशयावरून पत्नीला जबर मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या अंगावर संशयिताने गाडी घातली.
दरम्यान, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतोष जगदाळे (रा. सासवड, पुणे) याला शिताफीने अटक करण्यात आले. हल्ला केल्यानंतर १३० किलोमीटर पाठलाग करून थरारक पद्धतीने शहर पोलिसांच्या पथकाने संतोष जगदाळेला ताब्यात घेतले. गेले वर्षभर तो पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्थानकात ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न करण्यासह शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरवळ (सातारा) पोलिसांनी दिली.
रत्नागिरी शहर पोलिसांच्या खास खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सासरवाडीला जाण्याच्या तयारीत असतानाच तो शिंदेवाडी फाटा ते भोरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी एक वाहनामध्ये संतोष असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोषच्या गाडीकडे जात असताना, संतोषने पोलिस असल्याची खात्री झाल्यावर गाडी मागे घेऊन पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून पोलिस सुदैवाने बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here