कोरोनाचे संक्रमण थोडेफार कमी होत असतानाच त्याच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच या व्हेरिएंटचे तब्बल २१ रुग्ण राज्यात सापडले आणि चिंतेत अधिकच भर पडली ती रत्नागिरीतील १५ डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे!. यामध्ये तीन मुलांना लागण झाली होती पण या तिन्ही मुलांनी या विषाणूवर यशस्वी मात केली आहे. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले-गावडे यांनी दिली आहे.
लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीत स्वस्तिक हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि महिला रुग्णालय येथे कोविड बाल रुग्णालय आणि कोविड बाल रुग्ण कक्ष उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार पहायला मिळाला आहे. साधारण 2908 लहान मुले कोरोनाबाधित झाली आहेत आणि या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील ८० वर्षांच्या वृद्धेचा संगमेश्वर येथे मृत्यू झाला.