रत्नागिरी – रेल्वे स्टेशन फाट्याजवळील रत्नप्रभा होसींग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 38 हजार 960 रुपयांच्या दारुसह 2 लाख 88 हजार 960 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
रत्नप्रभा होसींग सोसायटी येथे देशी विदेशी मदयाचा साठा केला असल्याची माहिती भरारी पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, प्र. अधिक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी ओमगौरी चायनीज सेंटर येथून देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला. तसेच आरोपी लॉकडाउनचा फायदा घेवून त्याचे स्वत:चच्या वाहनातून विक्री करीत होता अशी खबर मिळाली होती.
त्यानुसार त्याच्या हुंदाई आय 10 वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी-विदेशी मद्याचा साठा मिळून असा एकूण 2 लाख 88 हजार 960 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई भरारीपथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली. याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी (वय 44 वर्षे रा. रत्नप्रभा हौसींग सोसायटी बी विंग ता. जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आ