प्रतिनिधी:राहुल वर्दे
रत्नागिरी: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला असनी चक्रीवादळाचा पडसाद लागले. दुर्देवाने पुन्हा एकदा तळकोकणाच्या जवळ असलेल्या या परिसराला वादळाने गाठले. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील रायपाटण, पाचलमध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले.वाऱ्याच्या प्रचंड वेगाने घरांवरील कौले ,पत्रे उडून गेले. ऐन आंबा, काजू हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच या वादळाने पुन्हा आंबा, काजू बागांना मोठा दणका दिला असून काही बागा वादळात उद्ध्वस्त विजेचा पुरवठाही खंडित झाला.
वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा, काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. कलमे वाकून मोडून पडली. शासन स्तरावरून या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.