रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी चिपळूण तालुक्याला भेट देऊन महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचा आढावा घेतला. पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी, त्यांनी चिपळूण,खेड महाड ह्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी या भागातील पुरग्रस्तांशी चर्चा केला ह्या पूर्ण दौऱ्यात उदय सामंत देखील सामील होते.
रत्नागिरी ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग ६६ सध्या चालू आहे.चिपळूण ते खेड बहादूर शेख मार्गे अवजड वाहनांकरिता बंद आहे रत्नागिरी आंबा घाट मार्ग बंद आहे.चिपळूण बहादूर शेख येथील पुलाचा भाग वाहून गेल्याने तेथे भराव टाकून लहान वाहनांकरीता वाहतूक चालू केली आहे.कोणत्याही अडचणीच्या वेळी या क्रमांकावर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक – 100,02352 22222,8888905052.