रत्नागिरी: अनिल परबांना मोठा धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस; ६३ लाखांचा दंड आकारणार?

0
44
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुबंई- शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील दोन रिसॉर्टवर कारवाई करत, ती जमीनदोस्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल ६३ लाखांचा दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील दोन रिसॉर्ट पाडण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या संयुक्त समितीने केली आहे. मात्र, अनिल परब यांनी मात्र या रिसॉर्टची मालकी नाकारली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याने बहुचर्चित असलेल्या व सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या साई रिसॉर्टवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी केंद्राच्या तज्ज्ञ समितीने रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here