प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी – आंबा घाटातील अनेक अपघातांना आमंत्रण ठरलेले खड्डे तातडीने बुजवण्यात येत आहेत. नागपूर हायवे साखरपा, मुर्शी ,दःखण आंबा घाटातील खड्डे पडलेले रस्ते बुधवार १२ जानेवारी 2022 पर्यंत न भरल्यास रस्ता रोको अंदोलन शेतकरी कष्टकरी संघटना व काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल तातडीने नॅशनल हायवे ऑथरटी,नवी दिल्ली यांनी घेतली. कार्यकारी अभियंता बांगर यांनी शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्षांना १२ जानेवारी पर्यंत काम पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे. काम पूर्ण होण्यास कदाचित चार पाच दिवस पुढे मागे होतील. तसेच रस्त्याचे खड्डे पूर्ण खडी डांबराने भरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करू असेही सांगितले.सदर काम ऊपअभियंता मडकईकर यांचे देखरेखी खाली चालू करण्यात आले आहे.रास्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याचे फोटो सुद्धा संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना आणि काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा ऊपाध्यक्ष,प्रवक्ते अशोकराव जाधव यांना पाठवून देत १२ तारखेचे रस्ता रोको आंदोलन करू नये अशी विनंती केली .
त्याप्रमाणे अशोकराव जाधव , विश्वनाथ किल्लेदार , कॅप्टन हनिफ खलपे , जेष्ठ नेते प्रा आबाजी सावंत , जिल्हा ऊपाध्यक्ष राजेश पत्यानी ,युवक नेते बापू लोटणकर , सुरेश शिंदे , अशोक (दादा ) गांधी , काका शेटये, माने सर , भाई बेर्ड , पत्की , मुरलीधर बाईंग, जायगडे , कोलते , दळवी, चाळके इत्यादी काँग्रेस नेते व शेतकरी कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी हे संयुक्तपणे पहाणी करुन दिनांक १० जानेवारी रोजी अंदोलन करायचे की स्थगित करायचे ? याचा निर्णय घेतला जाईल असे विश्वनाथ किल्लेदार सरचिटणीस शेतकरी कष्टकरी संघटना यांनी सांगितले .
आम्ही रस्ता दुरुस्त करतो पण रस्ता रोको आंदोलन करू नका असा प्रस्ताव प्रशासनाने अशोकराव जाधव यांच्या समोर ठेवला आहे. अशोकराव जाधव यांनी चिपळूण मधील कुंभार्ली घाट दुरुस्ती करता २० डिसेंबर २०२१ ला अंदोलन छेडले होते. ते अंदोलन रस्ता दुरुस्त करून घेवून यशस्वी केले. आता आंबा घाटाचे अंदोलन पुकारल्या नंतर घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले आहे. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनीधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अशोकराव जाधवांसारखाच असावा ,अशी चर्चा रत्नागिरी , सिंधुदूर्ग मध्ये सुरू आहे असे किल्लेदार यांनी सांगितले .


