रत्नागिरी: आदित्य ठाकरे १६ ला रत्नागिरी दौऱ्यावर

0
22
स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके - आदित्य ठाकरे

रत्नागिरी– शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शुक्रवार दि . १६ रोजी रत्नागिरीत येत आहेत . रत्नागिरीतील त्यांचा ‘ संवाद निष्ठा ‘ मेळावा १५ हजार लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आम . राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .ही सर्व उपस्थिती रत्नागिरी तालुक्यातीलच असणार आहे , असेही आम . साळवी यांनी सांगितले . रत्नागिरीतील मेळावा आटोपून ते चिपळूणला आणि तेथून दापोलीकडे रवाना होणार आहेत .

आदित्य ठाकरे यांच्या सोबत खास . विनायक राऊत , आम . भास्कर जाधव असणार असून खासदारांच्या नेतृत्वाखाली युवा नेत्याचे जोरदार स्वागत विमानतळावर केले जाणार आहे . शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार असून येथून ते साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळच्या मैदानात येऊन येथेच त्यांचा ‘ संवाद निष्ठा ‘ मेळावा होणार असल्याचे आम . साळवी यांनी सांगितले . यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे , सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक , जिल्हाप्रमुख विलास चाळके , उपजिल्हाप्रमुख संजय साळवी , तालुकाप्रमुख प्रदीप साळवी , समन्वयक संजय पुनसकर , विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद शेरे उपस्थित होते . आदित्य ठाकरे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर कोकणनगर मार्गे साळवी स्टॉप येथे येणार आहेत . जलतरण तलावाजवळ संवाद निष्ठा मेळावा झाल्यानंतर आदित्य ठाकरे चिपळूण आणि तेथून दापोलीकडे रवाना होणार असल्याचे आम.साळवी यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here