रत्नागिरी: एक जिल्हा एक उत्पादन विषयावर उद्योजकांची 2 दिवसीय परिषद

0
56

रत्नागिरी- राज्याचा उद्योग विभाग, संचालक उद्योग आणि लघुव्यवसाय विकास बँक (सीडबी), जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक जिल्हा एक उत्पादन व त्यातील गुंतवणूक निर्यात व व्यवसाय संधी या विषयावर दोन दिवसीय परिषद व प्रदर्शन 24 व 25 सप्टेंबर रोजी होत आहे.याचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता टिळक सभागृह, अरिहंत मॉल इमारत, तिसरा मजला, रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानक समोर, रत्नागिरी येथे होईल.

या परिषदेला उद्योग विभागाचे प्रधान तथा उद्योग विकास आयुक्त आणि निर्यात आयुक्त महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.सोबतच स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन याच ठिकाणी 24 तसेच 25 सप्टेंबर रोजी होणार आहे असे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here