मराठा मंदिर हायस्कूल, पाली येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. भविष्यात रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन हब असेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनीरिंग कॉलेज, कवी कालिदास संस्कृत विद्यालय उपकेंद्र, विभागीय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थानिक उपकेंद्र, शासकीय लॉ कॉलेज आदि शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होतील असेही त्यांनी सभेत बोलताना सांगितले.
याच शाळेमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही शिक्षण झाले असून या ठिकाणी लागेल ती मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच आपण डिजिटल पुरतेमर्यादित न राहता सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लोवले, ता. संगमेश्वर येथे ग्राम विलगीकरण केंद्रास भेट दिली व पाहणी केली.
यावेळी जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, पं.स. समाजकल्याण सभापती श्री.कदम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बने, मुख्याधिपिका श्रीमती रावराणे, सचिन सावंत व संबंधित उपस्थित होते