रत्नागिरी एसटीचे वेळापत्रक कोलमडलेलेच.. लांजा, राजापूर मार्गावरील प्रवाशांचे हाल

0
37
अलिबाग ते श्री क्षेत्र नरसोबाची वाडी थेट एसटी सेवा सुरू; भाविकांसाठी सुखदायक सुविधा
अलिबाग ते श्री क्षेत्र नरसोबाची वाडी थेट एसटी सेवा सुरू

रत्नागिरी : दिवाळी, कार्तिकी वारीसाठी मोठ्या प्रमाणात एसटी बसेस गाड्या लांब पल्ल्याच्या अंतरावर गेल्या होत्या. सण संपूनही अद्याप एसटीचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः सकाळी, सायंकाळच्या सुमारास याचा त्रास सर्वाधिक होत आहे. लांजा, राजापूर मार्गावर अत्यंक कमी प्रमाणात बसेस सोडत असल्यामुळे या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून प्रवास सुरू आहे. नोकरदार, व्यापारी, सामान्य प्रवाशांना तासन्तास बसेसची वाट पहावी लागत आहे. विशेषतः लांजा, राजापूर मार्गावरील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याकडे एसटी विभाग नियंत्रक, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

दिवाळी, कार्तिकीवारीसाठी जिल्ह्यातून दीडशेहून अधिक गाड्या लांब पल्ल्याच्या अंतरावर गेल्या होत्या. त्यामुळे जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. वेळेवर गाड्याच येत नसल्यामुळे नाईलाजास्तव खासगी बसेसने प्रवास करावा लागला. काहींनी दोन दोन तास वाट पाहून गर्दीत उभे राहून प्रवास करत लांजा, राजापूर गाठले. वेगवेगळ्या मार्गावर गाडी न थांबल्यास मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. काहीवेळा किरकोळ हाणामारी, शिवीगाळचे प्रकार ही झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीच दिवसांपूर्वी एसटीचा पाटा तूटून गाडी पूर्ण वाकली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी जागेवरच थांबवली गेली. त्यामुळे सुस्थितीतील बसेस सोडण्यात याव्यात एसटीचे वेळापत्रक व्यवस्थित करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

सध्या रत्नागिरी विभागात चालक, वाहकांची कमतरता असून जागा भरल्याच गेल्या नाहीत. 500 हून अधिक चालक वाहकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच कित्येक जुन्या बसेस भंगारात गेल्या आहेत. त्यामुळे बसेस ही अपुऱ्या पडत आहेत. चालक वाहक आणि अपुऱ्या बसेसमुळे एसटीचे वेळात्रकास फटका बसत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे एसटी विभाग, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here