प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- शासनाने येत्या दोन दिवसात हजर होण्याच्या सूचना केल्यानंतर एसटी कर्मचारी हळूहळू संपातून मागे घेत असून बुधवारी तब्बल 51 कर्मचारी हजर झाले यामध्ये 21 कर्मचारी नियमित तर 33 कर्मचारी सेवासमाप्तीचे हजर झाले आहेत. या सर्वांची मेडिकल झाल्यानंतरच कामावर हजर करुन घेण्यात आले. येत्या दोन तीन दिवसात 50 टक्के एसटीचे वेळापत्रक सुरु होईल, असा विश्वास रत्नागिरी एसटी विभागाने व्यक्त केला आहे.
शासनाने आवाहन केल्यानंतर कितपत एसटी कर्मचारी सहकार्य करतील अशी साशंकता वाटत असताना बुधवारी जवळपास 51 कर्मचार्यांनी मेडिकल करुन हजेरी लावली. एसटी विलीनीकरण होणे शक्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असून विलीनीकरण सोडून बाकी पगार वाढ चांगली करण्यात येईल त्यासाठी आधी हजर व्हावे, असे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार आता टप्याटप्याने मेडिकल ज्या पध्दतीने होईल त्यापध्दतीने पार पडेल तसे कर्मचारी हजर होणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.