मुंबई भिवंडी येथून रत्नागिरी येथे प्रवाशी घेऊन निघालेले एसटी महामंडळाची एमएच-20-बीएल-2459 या क्रमांकाची बस दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात स्लिप झाली. कशेडी घाटात एका वळणावर एसटी चालकाने अचानक मारलेल्या ब्रेकमुळे बस स्लिप झाली. त्याचवेळी चिपळूण कडून महाडकडे जात होता. या जाणाऱ्या डंपरवर आदळली. या अपघातात एसटी बसचे चालक, वाहक तसेच 21 अन्य प्रवाशी जखमी झाले.
अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढून नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिका, 108 आणि खेड येथील मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.