रत्नागिरी: चिपळुण येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन

0
88

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

चौपदरीकरणाचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करणार असे आश्वासन महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. चिपळूण- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण असलेल्या चौपदरीकरणाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज गुरूवारी चिपळूण येथील पाॅवर हाऊस येथे महामार्ग रोखत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी चौपदरीकरणातील परशुराम ते वाकेड या दरम्यानचे तिनही टप्पे 31 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले गेल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here