रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रत सोडले

0
114
कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविले

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज आणखी दोन ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले. रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल ‘वनश्री’ नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी ‘प्रथमा’ आणि ‘सावनी या कासवांना वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते.

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना अशा प्रकारे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here