दापोली- ‘ शाळेबाहेरची शाळा ‘ या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरची विद्यार्थीनी आरोही महेश मुलूख हिची आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून नुकतीच मुलाखत घेण्यात आली. आकाशवाणी नागपूर केंद्राच्या ऋतुजा पाटील यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीत शाळेचे महत्त्व, आजूबाजूस दिसणाऱ्या वस्तू व त्यांचे आकार, आवडते गाणे, आवडते गाणे, अभ्यास, शाळेची आवड, मैत्रिणी आदी मुद्दय़ांवर ही मुलाखत घेण्यात आली. आरोहीची आई मानसी मुलूख यांनाही काही प्रश्न विचारण्यात आले. आकाशवाणी नागपूर सारख्या मोठ्या माध्यमाने आरोही मुलूख हिची दखल घेतल्याबद्दल आरोहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


