रत्नागिरी प्रवासात महिलेची बॅग लांबवली

0
34
रत्नागिरीत तब्बल साडेआठ लाखांचा मुद्देमाल लांबवला

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची हॅन्डबॅग लांबवून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री पाऊणच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली . याबाबत बाळकृष्ण गोपाळ शेट्टी ( ५४ , रा . ठाणे ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे . त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी ते पत्नीसह उडपी येथून मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास करत होते . त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबली असता त्यांची पत्नी झोपी गेल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांची हॅन्डबॅग खेचन पळ काढला . बॅगमध्ये १ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने , रोख ५ हजार आणि १० हजारांचा मोबाईल असा एकूण २ लाखांचा ऐवज होता . अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here