प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- मंगलूर सेंट्रल येथून रेल्वेने प्रवास करत असताना एका प्रवाशाचा 73 हजार 600 रुपयांचा ‘आयफोन’ चोरीस गेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेन्सी फ्रान्सीस मेन्ड्रोन्सा (22, कर्नाटक) हा मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होता. तो झोपलेले असताना रेल्वेमध्ये चार्जिंगला लावून ठेवलेला मोबाईल चोरीस गेला.
याबाबतची फिर्याद त्याने चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


