रत्नागिरी : मिशन झिरो ड्रॉप आऊट अंतर्गत दापोली तालुक्यातील शंभर टक्के शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करणार:तहसीलदार दापोली

0
161

दापोली: दापोली तालुक्यातील शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित मुले शाळेच्या प्रवाहात यावीत यासाठी ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत मिशन झिरो ड्रॉप आऊट ही मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती दापोली तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी श्री अण्णासाहेब बळवंतराव यांनी दिली
दापोली खोंडा अहमदनगर झोपडपट्टी मध्ये दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांनी ३० ते ४० कुटुंबांना भेट दिली व शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांच्या पालकांना उद्बोधित केले याप्रसंगी त्यांच्या समवेत दापोली तालुका पंचायत समिती उर्दू विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री ताजुद्दीन परकार, दापोली उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री आताऊल्ला फकी व प्रगणक श्री नांदगावकर व समिती सदस्य उपस्थित होते, या शोध मोहिमेत स्थलांतरित होऊन आलेली पाच शाळाबाह्य बालके सहा ते आठ वयोगटातील पाच बालकांचा शोध घेण्यात आला या बालकांना दापोली उर्दू शाळेत दाखल करून घेण्यात आले आहे
दापोली शिक्षण विभाग मिशन झिरो ड्रॉप आऊट विशेष मोहीम राबवत आहे शिक्षणापासून वंचित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मिशन झिरो ड्रॉप आऊट ही शोध मोहीम सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे राज्यात शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे दापोलीतील शंभर टक्के बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करण्यासाठी शाळाबाह्य ,स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या मुलांची शोध मोहीम सुरू करण्याबाबतचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

दापोली शिक्षण विभाग मिशन झिरो ड्रॉप आऊट विशेष मोहीम राबवत आहे शिक्षणापासून वंचित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मिशन झिरो ड्रॉप आऊट ही शोध मोहीम सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे राज्यात शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे दापोलीतील शंभर टक्के बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करण्यासाठी शाळाबाह्य ,स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या मुलांची शोध मोहीम सुरू करण्याबाबतचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट ही शोध मोहीम सुरू करण्यात आली असून दापोली तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी (सह अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरीय समिती सभेचे आयोजन केले होते सदर प्रसंगी दापोली नगरपंचायत चे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी ,बाल प्रकल्पाधिकारी ,नोडल ऑफिसर व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी समावेशित शिक्षण विशेष तज्ञ व गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ पस्थित होते.

दापोली तहसीलदार यांनी दापोली तालुक्यातील शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे सांगितले या उपक्रमात महसूल,ग्रामविकास, नगर विकास , महिला व बाल विकास अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आणि सूचना केल्या आहेत कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबाचे स्थलांतर झाले असून 6 ते 18 वयोगटातील अनेक मुलं शाळाबाह्य झाल्याचे दिसून आले आहे अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरची मोहीम सुरू करण्यात आली आहे या शोध मोहिमेमध्ये बालकांचा शोध घेताना नगरपंचायत व ग्रामपंचायत यामधील जन्ममृत्यू अभिलेख नोंदीचा वापर केला जाणार आहे त्यासोबतच कुटुंब सर्वेक्षण सुद्धा केले जाईल तसेच परिसरातील प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, बस स्थानक, रस्त्यावर भीक मागणारी बालके अशा विविध ठिकाणी काम करणारे बाल मजूर, मागास वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील मुलं यांची माहिती या शोध मोहिमेत घेण्यात येणार आहे या कामासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळा त्यातील पर्यवेक्षीय अधिकारी शाळेतील शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस व इतर विभागातील कर्मचारी अशा ठिकाणी पोहोचून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याची कार्यवाही करतील त्यादृष्टीने सर्व स्तरातील समित्यांनी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खाजगी बालवाडी इंग्रजी माध्यमातील ज्युनिअर केजी सीनियर केजी मध्ये जात नाहीत व ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोध मोहीम यामध्ये घेतली जाणार आहे ही शोध मोहीम विशिष्ट कालावधीसाठी असली तरी या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे या शोध मोहिमेसाठी व्यापक स्वरूपात जन प्रबोधन सुद्धा शालेय शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे ,सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम याद्वारे विविध संस्था व संघटना व स्वयंसेवी संस्था यांना याबाबत जनप्रसार व्यापक प्रमाणात करण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे असे देखील गटविकास अधिकारी श्री दिघे यांनी सांगितले
कशी राबवणार मोहीम..?

जन्म-मृत्यू अभिलेखांमधील नोंदीचा वापर

तात्पुरते स्थलांतर झालेल्या कुटुंबांच्या भेटी

18 वर्षांपर्यंतच्या दिव्यांग बालकांचाही समावेश

येथे होणार ‘मिशन ड्रॉपआऊट’
शहरी भागातील रेल्वेस्थानके बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर, स्थलांतरित कुटुंबे, बांधकामस्थळी, शेतमजूर वस्त्या आदी ठिकाणी.
ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार.
शाळाबाह्य मूल आढळल्यास गावस्तरावरील समिती, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष नोंदणी मोहीम राबवावी, त्या मुलाला त्याच्या वयानुसार वर्गात दाखल करावे. ढोलताशांच्या गजरात दिंडी काढून ही माेहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here