प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीसह दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे-चिरणी-कळंबस्तेमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे, महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.


