रत्नागिरी- लोडरच्या चाकाखाली सापडून कामगाराचा मृत्यू

0
71

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्टजवळ चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा लोडरच्या मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना काल सकाळी घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दिवाकर भूषण पासवान (४५ , मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी लोडर चालक सनोज कुमार विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात मयत कामगाराचा मुलगा दिलखुष दिवाकर पासवान (१८ , मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी ५ वा. त्याचे वडील आंग्रे पोर्ट येथे लोडरमधून साखरेची पोती उतरवत होते. त्यावेळी सनोजकुमार लोडर मागे घेत असताना लोडरच्या मागील चाकाखाली येऊन दिवाकर पासवान यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here