रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ङाॅ. सुभाष देव यांचे गोवा येथे आज 11 जानेवारी रोजी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज 12 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्यावर रत्नागिरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. देव यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ. देव यांचा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला यशोशिखरावर नेण्यात सिंहाचा वाटा होता. शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आज हरपले. रत्नागिरीत वकिली शिक्षणाच्या निमित्ताने रेड आणि व्हाईट हॉस्टेलच्या निमित्ताने देव सर सर्वाचेच पालक होते.


