प्रतिनिधी: राहुल वर्दे
दापोली- दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ तर्फे दरवर्षी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले जाते.तसेच या उत्सवादरम्यान दापोली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन येथे केले जाते.
यावर्षी येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटात – धीरज राकेश शिगवण- प्रथम क्रमांक, निबंधलेखन स्पर्धा मोठा गट– सेजल श्रीकांत कोळबे- द्वितिय क्रमांक, हस्ताक्षर लेखन स्पर्धा मोठा गट– श्रावणी श्रीधर मुळे- उत्तेजनार्थ क्रमांक, उतारावाचन स्पर्धा मोठा गट– वेदांत सुनिल पवार- तृतिय क्रमांक, रंगभरण स्पर्धा लहान गट– मनस्वी वसंत आंबेलकर- प्रथम क्रमांक, सांस्कृतिक स्पर्धा विभागात उत्कृष्ट ढोलकीवादन– यश स्वप्नील मिसाळ- प्रथम क्रमांक, शेतकरीनृत्य गायन, वादन व नृत्य स्पर्धा– तृतिय क्रमांक, कोळीगीत गायन, वादन व नृत्य स्पर्धा- उत्तेजनार्थ क्रमांक, देशभक्तिपर गीत गायन, वादन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे.
सांस्कृतिक स्पर्धा प्रकारांत पुढील विद्यार्थी सहभागी झाले होते- गायन– आयुर महेश मुलूख, ढोलकीवादन– यश स्वप्नील मिसाळ, डफली– धीरज राकेश शिगवण, घुंगरू– विघ्नेश प्रविण मुलूख, नृत्य व गायन– श्रावणी श्रीधर मुळे, नीरजा मनोज वेदक, वैष्णवी वसंत आंबेलकर, आरोही महेश मुलूख, मनस्वी वसंत आंबेलकर, वेदांत सुनिल पवार, सोहम संजय बैकर, इशांत राजेंद्र पागडे, दीप राकेश शिगवण, प्रथम संतोष गावडे, सांची सदानंद मिसाळ, अस्मिता अशोक मुलूख, सौम्या रुपेश बैकर, दिया अरुण मुलूख, विराज राजेंद्र मुलूख, अथर्व सुनिल रांगले, पूर्वा सचिन जगदाळे, वेदीका सुभाष मुलूख, मानवी रुपेश पवार, प्रसाद नरेश शिगवण आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रीमा कोळेकर, अर्चना सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक, मानसी सावंत, स्नेहा शहा, श्वेता मुलूख व ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली.स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण व सर्व सदस्य, शिक्षक- पालक संघ, माता- पालक संघ व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.