रत्नागिरी : सायबर क्राईमचा आरोपी प्रथमच पोलिसांच्या हाती, गुहागर पोलिसांची कामगिरी

0
29
ऑनलाइन गंडा,cyber crime,
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणाला घातला ४ लाखांचा ऑनलाईन गंडा

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

गुहागर- ऑनलाईन फसवणूक करुन बँक खाते रिकामे करणाऱ्या चोरांविरुद्ध तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. मात्र त्यांचा कधी तपास लागत नाही, या आजवरच्या अनुभवाला छेद देत प्रथमच एका सायबर गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गुहागरमधील महिलेच्या बँक खात्यातील ७९ हजार रुपये लाटणाऱ्या या चोरट्याला गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये अटक केली आहे.
गुहागर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनियअर असलेल्या एका महिलेला फेब्रुवारी २०२२ मध्ये दिल्लीतून फोन आला. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डवर क्रेडीट सिक्युरिटी प्लॅन कार्यरत झाला आहे. त्यामुळे दरमहा आपल्याला २४०० रु. भरावे लागतील. हा प्लॅन रद्द करायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्डचा १६ अंकी क्रमांक द्या. सदर महिलेने क्रेडिट कार्ड क्रमांक सांगितल्यावर बोलण्यात गुंगवून या व्यक्तीने महिलेकडून सीव्हीव्ही क्रमांक व ओटीपीही मागून घेतला. ओटीपी मिळाल्यावर अवघ्या दहा मिनिटांनी या महिलेल्या खात्यातून ७९ हजार ९९२ रुपये दिल्लीमधील दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले.
पैसे एका बँक खात्यात जमा झाल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्या दिशेने तपास केल्यावर हे बँक खाते विशालसिंग राजेंद्रसिंग शेखावत, रा. जयपूर बेंनार रोड, जिल्हा जयपूर, राजस्थान याचे असल्याचे कळले. विशालसिंगने हे सर्व व्यवहार पाटपरगंज दिल्लीतून केले होते. त्याचे बँक खाते हे मर्चंट सर्व्हिसमध्ये लिंक होते. गुहागर पोलिसांच्या पथकाने राजस्थान गाठले. तेथील पोलिसांच्या साह्याने पाळत ठेवून अखेर विशालसिंगला अटक केली. त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात आणखी काही गुन्हे उघड होऊ शकतात, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सातपुते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here