रत्नागिरी: १ जून ते १५ जुलै दरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा; कुलगुरूंच्या बैठकीमध्ये निर्णय – उदय सामंत

0
83
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेची वेळ 10 मिनिटं अधिक वाढवून देण्याचा निर्णय

ऑफलाइन परीक्षा घेण्यावर विद्यापीठांचे कुलगुरू ठाम

रत्नागिरी – राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. १ ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.

कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता 1जून ते 15जुलै पर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.

बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here