रशियामध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. या विमानातुन २३ लोक प्रवास करत होते.हे विमान रशियाच्या टाटरस्तान भागात कोसळले आहे. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत. या विमानातुन पॅराशूट जंपर्सचा एक ग्रुप जात होता. टाटरस्तानवरून उड्डाण घेताना या विमानाचा अपघात झाला. रशियामध्ये दुर्गम भागात जुन्या विमानांचे अपघात कमी झालेले नाहीत.
रशियाच्या सुदूर पूर्वेला अँटोनोव्ह एन-२६ वाहतूक विमान कोसळले होते, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर, जुलैमध्ये कामचटका येथे एका विमान अपघातात एंटोनोव्ह एन-२६ ट्विन-इंजिन टर्बोप्रॉपमधील सर्व २८ जण ठार झाले होते. याशिवाय, २०१९ मध्ये सुखोई सुपरजेट मॉस्को विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळून आग लागली होती. त्या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला होता.