रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस ! युद्धामुळे युक्रेनची खूप मोठी हानी झाली आहे. जगातील सर्वात मोठे कार्गो विमान म्हणून ओळखले जाणारे अँटोनोव्ह AN-२२५ हे विमान या युद्धात नष्ट झाले आहे. युद्ध सुरु झाल्या दरम्यान विमान युक्रेनची राजधानी कीवच्या एका एअरफिल्ड येथे पार्क करण्यात आला होते. या विमानाचे नाव ‘Mriya’असे आहे, ज्याचा युक्रेनियन भाषेत अर्थ ‘स्वप्न’ असा आहे .किव्हमध्ये रशियाने जोरदार हल्ला चढविला आहे. हल्ल्लात नष्ट झाले आहे. तरीपणी आपण त्याची पुन्हा दुरुस्ती करू असे युक्रेन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या विमान वाहतूक क्षेत्राचे आणि हवाई मालवाहू क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. रशियन फेडरेशन त्याच्या दुरुस्तीचा सर्व खर्च उचलावा असे युक्रेनच्या राज्य संरक्षण कंपनीने म्हंटले आहे.अँटोनोव्ह कंपनीने हे विमान तयार केले होते . हे विमान 1985 मध्ये पूर्ण झाले.


