मुंबई – ‘मुलगी झाली हो’ या छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मालिकेत अभिनेते किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. पण आता त्यांना या मालिकेतून काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे असा किरण यांचा आरोप आहे . .
किरण यांनी सोशल मीडियावरही ‘ काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !’ अशी पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी ‘आयस्टँड व्हिथ किरण माने’ असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.आता काँग्रेस नेते सचिन सावंत आणि जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये ‘किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. असे लिहिले आहे.


