ओमिक्रॉनमुळे भारतात भीतीचे वातावरण आहे. भारतात ओमिक्रॉनचे 23 रुग्ण आढळले आहेत. एकीकडे ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे चिंता वाढत चालली आहे. तर दुसरीकडे दिलासा देणारी आणि टेन्शन कमी करणारी गोष्ट घडली आहे.महाराष्ट्रातील पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. राजस्थानमधील सर्वच्या सर्व 9 ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जयपूरमधील सर्व ओमिक्रॉनबाधित 9 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्व रुग्णांना आरयूएचएल रुग्णालयातून देण्यात आला आहे. यासोबत त्यांना घरी गेल्यानंतर सात दिवस विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.’