मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज विधान भवनातील निवडणूक कार्यालयात या दोघांकडून अर्ज सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मविआतील अनेक मंत्री व नेते हजर होते.
सदर अर्ज भरताना सर्व नेतेमंडळी हजर राहून महाविकास आघाडीने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.