राज्याचा निकाल 94.22 टक्के, कोकण विभाग अव्वल

0
140
दहावी निकाल,
दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; कोकणातील ९९.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

आज 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. आज, दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मोबाईलवर देखील SMS च्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे.

राज्याचा निकाल 94.22 टक्के, यंदाही कोकण विभाग अव्वल आले आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के लागला आहे.सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.21 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 90.51 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 91.71 टक्के आला आहे

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल आजच जाहीर करण्यात येणार आहेत. निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राज्य शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल किती टक्के लागला, विभागनिहाय निकाला संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here