मुंबई राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे स्वत: राजीनाम्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले. राज्यपालांकडे राजीनामा सोपवून उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला आहे.त्याच क्षणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे. एकमेकांना त्यांनी पेढे भरवले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भाषण करुन लोकांशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली आहे. येत्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम करु. गोर गरीबांसाठी ठाकरे यांनी काम केले. कोरोना काळात एक मुख्यमंत्री कसे काम करु शकतो याचे चांगले उदाहरण त्यांनी दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे दिर्घकाळ जनतेच्या लक्षात राहतील असे जयंत पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हंटले.
संजय राऊत यांनीही ”मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला सांभाळून घेतले, मार्गदर्शन केले, स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते, अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नैतृत्वात नवीन सरकार स्थापन करणार आहोत. ते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आहोत असे सांगितले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या साथीने ते सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली जोरात सूरु झाल्या आहेत.


