राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे नागपूरचे वकिल सतीश उके यांच्या घरी पहाटे पाच वाजताच ईडीचे पथक धडकले आणि वकिल सतीश उके यांना ताब्यात घेतले.मात्र, इडीला घरी काहीच सापडले नाही, असा दावा उके यांच्या नातेवाईकांनी या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सहा तासाच्या शोधानंतर इडीचे अधिकारी केवळ एक मोबाईल व लॅपटॉप घेऊन गेले, असे त्यांनी सांगितले आहे.
सतीश उके यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके यांनाही इडीने ताब्यात घेतले आहे. तेदेखील वकिल आहेत. भाजप नेत्यांविरोधात आरोप करत असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.