राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये दहा हजार पदभरती सुरू

0
98
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई- जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण 10 हजार 127 रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्‍त झालेले असून, यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावरच घेण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here