मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सध्या संकटात सापडलं आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सूरतमध्ये निघून गेले आहेत.
यामुळे हे सरकार संकटात आलंय. राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना अकोलामध्ये वेगळचं नाट्य रंगलं आहे.
अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसांत दाखल केली आहे. मंगळवार (दि. 21) पासून नितीन देशमुख यांचा फोन बंद असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितलं. अकोला जिल्ह्यातील सेनेचे बळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी मिसिंगची ही तक्रार दाखल केली आहे.


