राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील शाळांना उद्यापासून म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईतील शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या फैलावामुळे अनेक पालकांना आणि शाळकरी मुलांना आपल्या गावी जाता आले नाही.यंदाच्या दिवळीत कोरोनाचा फैलाव कमी झाला असल्याने पालक आणि मुलं आपल्या मूळ गावी जाण्यास उत्सुक आहेत.