राज्यातील 2,062 रिक्त जागांवर शिक्षण भरती-शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

0
139

राज्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी मोठी भरती होणार आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागात एकूण 2,062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अर्ज आले आहेत. या अर्जांमधून 3,902 उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2,062 रिक्त पदांसाठी 15,123 पसंतीक्रमावर 3,902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे.’ तसंच शिक्षण मंत्र्यांनी या उमेदवारांना मुलाखतीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जवळपास 27,000 आणि माध्यमिक शाळेतील जवळपास 13,000 अशी एकूण 40,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभागाकडून या रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 6,100 जागाची भरती करण्यात येत आहे. याबाबतची माहिती 8 जुलै रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here