राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनमुळे येऊ शकेल अशी शक्यता व्यक्त केली आहे नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे.गर्दीची ठिकाणे ,लग्न समारंभ प्रत्येकानेच आपली जबाबदारी म्हणून टाळावेत आणि चेहर्यावरचा मास्क बाहेर जाताना नेहमी वापरावा आणि कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
ओमायक्रॉनपासून घाबरण्याचे कारण नाही, लाट आली तरी ती सौम्य असेल पण खबरदारी महत्वाची आहे असेही ते म्हणाले.येत्या जानेवारीअखेरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकेल असे तज्ञाचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.