राज्यात जोरदार पाऊस;हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट

0
97

राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने (Maharashtra Monsoon Update) हजेरी लावली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाकडून राज्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज (Maharashtra Weather forecast) व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडण्यााच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार पाऊस सुरु झाला आहे

मराठवाड्यात सोमवारी औरंगाबाद आणि जालन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी परभणी, नांदेडसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rain forecast) झाला. विदर्भात देखील अकोला, वर्धा, भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस झाला. जवळपास महिनाभरानंतर पावसाने हाजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी सुकू लागलेली पिकं पावसाच्या कमबॅकमुळं पुन्हा एकदा बहरली आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी सुखावला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. मात्र पाऊन पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here