राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

0
87

राज्यात उद्यापासून 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र झाल आहे, पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल त्यांनतर पश्चिम- उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला 19 सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here