मुंबई- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार १२ सप्टेंबरपासून राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहीतीनुसार महाराष्ट्रात सोमवार (१२ सप्टेंंबर) पासून चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहील. कोकणसह मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. घाट भागात मुसळधार पाऊस पडु शकतो असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. या परिसरातील नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्टारात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्याचबरोबर उत्तराखंड, ओडिशा, बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आणखी काही राज्यात तीन ते चार दिवस तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


