कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात अजूनही प्राथमिक शाळा सुरू करण्यात आलेल्या नाही. राज्यात 8 ते 12 वीच्या शाळा सुरू आहेत. आता मात्र, पहिली ते 10 वीच्या शाळा होणार आहे.राज्य सरकारने हा निर्णय गुरुवारी जाहीर केला.टास्कफोर्सनं शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली अल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर प्रशासन आणि टास्क फोर्सने मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता कायम आहे. जगातील अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसर्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून तिचा प्रभाव खूपच कमी असेल, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी माहिती दिली होती.