राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांच्या हाती याप्रकरणी अनेक पुरावे लागल्याने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याशिवाय शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनी एक वेलनेस सेंटर उभे केलेआहे.यासाठी अनेक लोकांकडून पैसे घेऊन नंतर त्यांनी कुणाचेही पैसे प्रत दिले नाहीत.या सेंटरचे नाव “आयोसिस वेलनेस सेंटर” आहे. सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईच्या चौकशीत जर काही पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला आईसह अटक होण्याची शक्यता आहे.