आज अभिने राज बब्बर यांचा वाढदिवस आहे.आज त्यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी नॅशनल स्लूक ऑफ ड्रामा (एनएसडी)मधून 1975 साली आपले अभिनयाची शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
1980 मध्ये ‘सौ दिन सास के’ पहिल्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासह रीना रॉय प्रमुख भूमिकेत होत्या. 1980 रिलीज झालेला ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या चित्रपटात राज बब्बर यांनी रेपिस्टची भूमिका साकारली होती. यामध्ये शेवटी नायिका त्यांची गोळी मारुन हत्या करते. या चित्रपटानंतर राज बब्बर यांचे अनेक उत्कृष्ट सिनेमे रिलीज झाले. या चित्रपटांमुळे ते बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते ठरले. त्यांचा सुपरडूपर हिट सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा ‘निकाह’ हा होता. राज बब्बर आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. ‘कॉरपोरेट’, ‘बॉडीगार्ड’, ‘कर्ज’, ‘फॅशन’, ‘साहब बीवी और गैंगस्टर’ आणि ‘बुलेट राजा’, ‘तेवर’ या चित्रपटांमध्ये त्यांचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले.
राज बब्बर 14 व्या लोकसभा निवडणुकीत ते फिरोजाबाद या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.सिनेसृष्टीसोबत राज बब्बर राजकारणातही सक्रिय आहेत.
राज बब्बर यांनी दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जहीर आहे. नादिरा आणि राज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही त्यांची नावे आहेत.राज बब्बर यांनी समाज बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले होते. त्यावेळी या दोघांवरही बरीच टीका झाली होती. मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न केले.