साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभासचा ‘राधे श्याम’ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. “राधे श्यामच्या भव्य पोस्टरसोबत जन्माष्टमी साजरी करा” असं कॅप्शन देऊन प्रभासने हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जानेवारी 2022 रोजी मकर संक्रातीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर आज जन्माष्टमीच्या दिवशी चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे.
या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे असुन आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजाची रोमॅण्टिक केमिस्ट्री दिसून आली आहे. तमिल, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या सहा भाषांमध्ये हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


