मुंबई / अनुज केसरकर
मुंबई महापालिकेसाठी सर्व पक्ष कंबर कसून तयार झाले असताना लोकनेते शरद पवार यांच्या युवा धोरणानुसार,राजकीय प्रवाहात जास्तीत जास्त युवकांचा सहभाग वाढला पाहिजे या उद्देशाने मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील,मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे,मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अँड.प्रशांत दिवटे यांनी ही नूतन कार्यकरणी जाहीर केली असून यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी वरळी तालुका अध्यक्ष अभिजित गजापूरकर यांना मुंबई प्रदेश सरचिटणीस व प्रशासक पदी नेमणूक करून राष्ट्रवादीच्या मुंबई नेतृत्वाने अभिजित गजापूरकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
युवा फाउंडेशन या संस्थेद्वारे समाजातल्या युवक युवतींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम तसेच विविध उपक्रम राबवून बहुजन समाजातल्या वर्गाचे संस्कारमूल्य जोपासण्याचे काम ,येथील अनेक प्रश्न तडीस नेण्याचे काम अभिजित गजापूरकर हिरीहिरीने करत असून,आता मुंबई बळकट करण्याचे काम मुंबई राष्ट्रवादीने त्यांच्यावर सोपवले आहे.


