प्रतिनिधी:पांडुशेठ साठम
सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावामध्ये मोबाईल रेंज नसल्याने ई- पीकपाणी ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन ई- पीकपाणी नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी मोबाईल रेंज नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ई- पीकपाणी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात यावी. तसेच नोंदणीबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात यावी. त्याच बरोबर सध्या भात कापणीचा हंगाम सुरु असून शासनाकडून होणाऱ्या भात खरेदीमध्ये देखील सुलभता यावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. याबाबतही तहसीलदारांना सूचना करण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.